संत गाडगेबाबा पुण्यतिथी - पथनाट्य

शिशुविहार व बालक मंदिर 5-7    23-Aug-2024
Total Views |
संत गाडगेबाबा पुण्यतिथी - पथनाट्य 

संत गाडगेबाबा पुण्यतिथी पथनाट्य          

सी.एच.एम.ई.सोसायटी संचालित बालक मंदिर ५वी ते ७वी मराठी माध्यमात बुधवार दि. २० डिसेंबर २०२३ रोजी स्वच्छतेवर आधारित गोदाघाट येथे पथनाट्य सादर करून संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली. समाजातील लोकांना स्वच्छतेचे महत्व पटावे,समाजात त्याचा प्रसार व प्रचार व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हे पथनाट्य सादर करण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांनी या अभियानाअंतर्गत स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे तसेच अंधश्रद्धा दूर करणारे पथनाट्य गोदाघाटावर सादर केले. गोदाप्रदूषण ही एक महत्त्वाची बाब असून त्याची जनमानसात जागृती करणे हे आपले कर्तव्य आहे, हे विद्यार्थ्यांनी त्यांच्या पथनाट्यातून सांगितले. स्वच्छतेसंदर्भात घ्यावयाची काळजी, अस्वच्छतेमुळे होणारे दुष्परिणाम, वाढणारी रोगराई यासंदर्भात माहिती सादरीकरणाद्वारे दिली .

नागरिकांनी गोदावरीची स्वच्छता व पर्यावरण यांचा समतोल साधणारा हा एक स्तुत्य असा उपक्रम शाळेने राबविला, त्यात त्यांनी विद्यार्थ्यांचे पाठांतर उत्तम असून विद्यार्थ्यांनी उत्तमरीतीने पथनाट्यांचे सादरीकरण केले असे मत व्यक्त केले.

पथनाट्य बघण्यासाठी बऱ्याच नागरिकांची गर्दी जमली होती. लोक त्याठिकाणी थांबून थांबून पथनाट्य बघत होते. लोकांनी दिलेला प्रतिसाद लक्षात घेता हे पथनाट्य दोन ठिकाणी सादर करण्यात आले.

स्वच्छतेची जनजागृती ही काळाची गरज असून त्याअंतर्गत बालक मंदिराने केलेला हा छोटासा प्रयत्न. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता पाटील व शालेय समिती अध्यक्षा मा. सौ. सुवर्णा दाबक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन सौ.प्रीती यावलकर यांनी केले असून त्यांना इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले.