मुख्याध्यापकांचे मनोगत

शिशुविहार व बालक मंदिर 5-7    09-Sep-2023
Total Views |

 
 
मुख्याध्यापकांचे मनोगत
 मा.सौ.नीता पाटील

       शैक्षणिक दृष्टीकोन व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या से.हि.मि.ए.सो. संचालित, बालक मंदिर इ. ५वी ते ७वी विभागवार वर्गरचना करण्यात आली. अपेक्षित असलेला सर्वांगीण विकास व्हावा हा उद्देशसमोर ठेवून शिक्षकांमध्ये जिद्दीने चिकाटीने काम करण्याची ताकद निर्माण करून त्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची उज्ज्वल पिढी घडवण्याचा प्रयत्न केला जातो.

    शाळेमध्ये केवल पुस्तकी ज्ञान न देता संगीत, चित्रकला, नृत्य, हस्तकला, योगासन, रामदंडी व व्यक्तिमत्त्व विकास यासाठी सहशालेय कार्यक्रम घेऊन जीवनशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो . विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार विकास घडवताना चारित्र्यसंपन्न ,सद्वर्तनी, आत्मनिर्भर, कार्यकुशल, सामाजिक बांधिलकी जपणारा विद्यार्थी उभा राहणे आवश्यक आहे. हे भारतीय मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा हेतू व श्रद्धा आहे.

     ज्ञान,  उपक्रमवर्तन, शिस्त, नियम या सर्वांचा मिलाफ साधून शाळेतील विद्यार्थी उत्तम जीवन जगण्यास तयार करण्याचा वसा घेऊन सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करतात . आमचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वात मोलाचे मार्गदर्शन मिळते ते संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे. आमच्या प्रयत्नांना आपल्या शुभेच्छांची किनार लाभावी ही इच्छा! धन्यवाद!