"बालक मंदिर च्या विद्यार्थ्यांनी लुटला online कलेचा आनंद"

शिशुविहार व बालक मंदिर 5-7    17-Sep-2021
Total Views |

"बालक मंदिर च्या विद्यार्थ्यांनी लुटला online कलेचा आनंद"

बुधवार दिनांक १५ सप्टेंबर २०२१ रोजी सी. एच. एम. ई. सोसायटी संचालित बालक मंदिर इ. ५ वी ते ७ वी मराठी माध्यमाच्या प्रांगणात गणेशोत्सवानिमित्त भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला.
यात विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहज सहभागी होता यावे यासाठी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनविणे, गणपती अथर्वशीर्ष पठण स्पर्धा, गणपती कोलाज काम, सलाड सजावट, रांगोळी काढणे, वारली पेंटिंग करणे या स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांसोबतच पालकांसाठी देखील इको फ्रेंडली गणपती आरास स्पर्धा आयोजित करण्यात आली.

गणेशोत्सवानिमित्त स्पर्धा
गणेशोत्सवानिमित्त स्पर्धा