गुरुपौर्णिमा

18 Aug 2021 12:09:03
गुरुपौर्णिमा
सी.एच.एम.ई.सो. संचालित बालक मंदिर पाचवी ते सातवी मराठी माध्यमात २३ जुलै २०२१,शुक्रवार रोजी ‘गुरुपौर्णिमा’ ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आली.
आपण गुरुपौर्णिमेला गुरु चरणी नतमस्तक होतो, त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतो मग निसर्ग सुद्धा आपला गुरू आहे या निसर्गाला गुरु मानून त्याच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी हा मोलाचा संदेश या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात आला.
आपण ज्या निसर्गात राहतो त्या निसर्गापासून आपण काही ना काही तरी नकळतपणे शिकत असतो. निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो म्हणूनच निसर्गाला सुद्धा आपला गुरू मानावे. हे या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना ‘निसर्ग माझा गुरु’ यावर लिखाणासाठी प्रेरित करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वेगवेगळ्या कल्पना लिखाणातून प्रत्यक्ष मांडल्या. कोणी ‘निसर्ग माझा गुरु’ यावर सुंदर लिखाण केले, तर कोणी कविता रचल्या, कोणी निबंध लिहिला तर काही विद्यार्थ्यांनी निसर्ग माझा गुरु या विषयाचे सुंदर चित्र रेखाटले अशाप्रकारे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील कल्पना स्पष्ट केल्या.
विद्यार्थ्यांच्या या लिखाणाचे ई-बुक तयार करण्यात आले.

गुरुपौर्णिमा_1  
Powered By Sangraha 9.0