कारगिल दिन 2021-22

शिशुविहार व बालक मंदिर 5-7    18-Aug-2021
Total Views |
कारगिल दिन
'बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो' या ओळींना साजेशी अशी कामगिरी २६ जुलै १९९९ या दिवशी आपल्या भारतीय जवानांनी करून दाखवली. त्यांच्या या पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी सोमवार दि. २६ जुलै २०२१ रोजी "कारगिल विजय दिवस" ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. कारगिल युद्धात भारतीय सेनेच्या कामगिरीची विद्यार्थ्यांना माहीती व्हावी , सैनिकांची शौर्यगाथा विद्यार्थ्यांना समजावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये सैनिकी शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी हा या कार्यक्रमा मागील उद्देश. यात विद्यार्थ्यांना पीपीटी द्वारे सौ.सुषमा चंद्रात्रे यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना नकाशाद्वारे कारगिल युद्धाचे ठिकाण दाखवून त्याची माहिती पीपीटी द्वारे देण्यात आली. यावेळी आपल्या संस्थेत दिल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणासाठी सुसज्ज असणाऱ्या शाखांची माहिती देखील विद्यार्थ्यांना दिली तसेच दरवर्षी प्रमाणे यावर्षीही संस्थेतून NDA साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती फोटोसहीत दाखविण्यात आली.

Kargil din 2021-22_1