विज्ञानदिन

शिशुविहार व बालक मंदिर 5-7    06-Mar-2020
Total Views |

विज्ञानदिन_1  H

शुक्रवार दि २८ फेब्रुवारी २०२० रोजी ‘विज्ञान दिन अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कु. कोमल राऊत हिने विज्ञान दिनाचा उद्देश तसेच त्याविषयी माहिती सांगितली, तर कु. अनुष्का मोहोळे हिने डॉ.सी.व्ही. रमण यांचे स्वगत वेशभूषेसह सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली गोसावी यांनी केले.

विज्ञान दिनाच्यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या शोधक, जिज्ञासू, ज्ञानपिपासू वृत्तीला तसेच विज्ञान विषयक ज्ञानाला जागृत करण्यासाठी विज्ञान प्रश्नमंजुषा घेण्यात आली. त्यात विज्ञान विषयकज्ञान, सामान्यज्ञान, संशोधक, दिनविशेष, अवयव ज्ञान, प्रयोगशाळेतील साहित्य ओळख, कोडी, अभिनय इत्यादी वेगवेगळ्या कसोट्याद्वारे एक एक फेऱ्या पार करत सहा गटातून अंतिम विजेता, गट घोषित करण्यात आला. अतिशय रंजक पद्धतीने आणि उत्कंठावर्धक वातावरणात स्पर्धा संपन्न झाली.

विजेत्या आणि उपविजेत्या गटाला, त्याचप्रमाणे उत्स्फूर्त उत्तरे देणाऱ्या प्रेक्षकातील विद्यार्थ्यांनाही शाळेच्या विभागप्रमुख सौ.नीता पाटील बाईंच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाची सांगता विज्ञान गीताने करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सौ. वैशाली गोसावी, सौ. चैताली कामळे, श्रीमती. सुषमा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.