विक्री उपक्रम 2019-2020

शिशुविहार व बालक मंदिर 5-7    28-Feb-2020
Total Views |

“विक्री उपक्रम”

दिवाळीचे निमित्त साधून विक्री उपक्रमाचे आयोजन
 

   सी.एच.एम.ई. सोसायटी संचालित बालक मंदिर इ.५वी ते इ. ७वी मराठी माध्यम या विभागात दिवाळीचे निमित्त साधून विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमाचे उद्घाटन मा.सौ.मंगला सवदीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

       या उपक्रमात दीपोत्सवास उपयोगात पडणा-या विविध वस्तू जसे पणत्या, वाती, उंबरपट्टी, रांगोळी स्टीकर, मेहंदी कोन, सुंगधी उटणे, Floating Candles, अॅॅक्रेलिकची पाउल,स्वस्तिक, फुलवात, समई वात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. सर्व वस्तू विक्री करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले व स्वत: त्या वस्तूंची विक्री केली. त्यातून विद्यार्थ्यांचे अनेक कौशल्ये दिसून आलीत. विद्यार्थ्यांना हिशोब करणे, नफा-तोटा, संवाद कौशल्य, नोटांचे विवरण कसे करावे हे जमावे व या सर्व गुणांचा विकास व्हावा हे या उपक्रमामागील उद्दिष्ट.

   विद्यार्थ्यांनी मनमुराद खरेदी-विक्री चा आनंद घेतला. योग्य भावात वस्तू कशी घ्यावी याचे विद्यार्थ्यांनी यातून ज्ञान घेतले. या उपक्रमास मा.सौ.मंगला सवदीकार, शाळेच्या विभागप्रमुख सौ. नीता पाटील व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

 
 
 

विक्री उपक्रम_1 &nbs