चला तंत्रज्ञानाकडे

28 Feb 2020 14:55:49

'चला तंत्रज्ञानाकडे’


दि.२४ जून २०१९ रोजी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयावर ppt सादरीकरण केले.
 

या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक जगाशी जोडण्याचा एक छोटासा प्रयत्न बालक मंदिरने केला. मुलांना सध्याच्या काळातील वाढत असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती होणे हा या कार्यक्रमामागील दृष्टीकोन होता.

कॉम्पुटर हि आजच्या जगात काळाची एक गरज आहे. त्यात विद्यार्थ्यांनी ही गरज एक कला म्हणून जोपासणे आवश्यक आहे. या गोष्टीला अनुसरून विद्यार्थ्यांनी एक विषय घेऊन त्याचे सादरीकरण ppt द्वारे केले. त्यात त्यांनी वेगवेगळ्या चित्रांचा, व्हिडिओ, चलचित्रांचा, आवाजांचा समावेश करून आकर्षक बनविण्याचा प्रयत्न केला होता.

कार्यक्रमाची प्रस्तावना सौ.यशश्री साठये यांनी केली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी Human Skeletal System, भारताची लोकशाही पद्धत, ग्रह व उपग्रह, ATM, Pulwama Attack, संगीत वाद्ययांसारख्या अनेक विषयांवर अतिशय उत्कृष्ट PPT सादरीकरण केले. या कार्यक्रमप्रसंगी शालेय समिती अध्यक्षा मा.अॅड.सौ.स्वप्ना सातपुरकरउपस्थित होत्या. त्यांनी मुलांच्या या तंत्रज्ञानाकडे होणाऱ्या वाढत्या वाटचालीचे कौतुक केले. याप्रसंगी पालकांची देखील उपस्थिती होती.

 
चला तंत्रज्ञानाकडे_1 
Powered By Sangraha 9.0