अग्निहोत्र मंत्राने बी रोपण करणे

शिशुविहार व बालक मंदिर 5-7    13-Jan-2020
Total Views |

1_1  H x W: 0 x 
 
उद्देश
  1. शेतीविषयी माहिती करणे
  2. पिकांचे निरीक्षण करणे.
  3. अग्निहोत्र मंत्राचा प्रभाव वनस्पतीवर पण होऊ शकतो हे प्रयोगाद्वारे सिद्ध करणे.
आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक रूढी परंपरा आहे. अनेक संस्कारक्षम गोष्टी आहे. आपल्या या गोष्टी आत्मसात करतो आणि वापरतो. आपल्या या परंपरेचा आपणच का उपयोग करू नये असा विचार घेऊन बागकाम या अंतर्गत घेण्यात आला. हा प्रयोग ऑस्ट्रेलियात घेण्यात आला. साध्या पद्धतीने व या पद्धतीने केलेल्या रोपणात फरक जाणवला. त्याचे रिझल्ट चांगले दिसून आले. त्यानुसार आपल्या शाळेत भाजीपाला लावण्यासाठी जमिन तयार केली. बी पेरणी करतांना सकाळी होम प्रज्वलित करून अग्निहोत्र मंत्राने आहुती देऊन त्या मंत्राच्या सान्निध्यात बी पेरले जाते व त्यांची राख म्हणून पिकांवर टाकली जाते. असा हा कार्यक्रम घेण्यात आला.
साध्य
विद्यार्थ्यांना बी पेरणी कशी करावी हे कळले. अग्निहोत्रमंत्र समजला. योग्य प्रकारे बनवलेले खत पिकांसाठी वापरता आले.
***************
स्मरणगाथा
 
उद्देश :-
  1. आजच्या पिढीपुढे सैनिकांचे कार्य मांडणे.
  2. अभिनय व संवाद कौशल्य विकसित करणे.
  3. देशाविषयी प्रेम व भक्ती निर्माण करणे.
  4. सैनिकांच्या व क्रांतिकारकांच्या बलिदानाची जाणीव लक्षात आणून देणे.
  5. शिक्षकांची लेखन क्षमता वाढवणे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, देशभक्ती निर्माण होण्यासाठी गुरुवार दि.२९ ऑगस्ट २०१९ रोजी एका आगळ्यावेगळ्या ‘स्मरणगाथा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 
विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या जीवनांवर आधारित प्रसंग नाट्याभिनय, नृत्य व गीत गायनाद्वारे सादर केले. त्यामध्ये रँडचा वध, काकोरी कट, सायमन गो बॅक, जॅक्सनचा वध यांसारखे प्रसंग प्रभावीपणे सादर करण्यात आले. ‘ए वतन मेरे वतन’ अशा काही गाण्यातून क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
 
क्रांतिकारकांचे अतूट देशप्रेम, देशभक्ती, जिद्द, चिकाटी, सहनशीलता, त्याग, शौर्य, संयम आणि सभाधीटपणा, संवादकौशल्य असे अनेक गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजावे, तसेच त्यांच्या उल्लेखनीय कार्याची प्रेरणा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.
वैशिष्ट्यपूर्ण बाब (साध्य) :-
लेखन सर्व शिक्षकांनी मिळून केले.
नाटक संपूर्ण शिक्षकांनी बसवले. त्यामुळे त्यातील बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास करता आला.
नाटकात काम न करण्याऱ्यां विद्यार्थ्यांना अभिनयासाठी वाव देण्यात आला, त्यामुळे विद्यार्थ्यांचा समाधीटपणा वाढला.
सैनिकांचे व क्रांतिकारकांचे कार्य विद्यार्थ्यांना समजले.
*******************
आषाढी एकादशी
उद्देश:-
  • संत व संत रचना यांची ओळख होणे.
  • अभंग ओळख होणे.
  • संतांच्या कार्यांची ओळख व त्यांची शिकवण त्यांच्या सादरीकरणातून करणे.
प्रवचन हा नामस्मरणातील, भक्तीतील समाजप्रबोधनासाठी वापरण्यात येणारा प्रकार विद्यार्थ्यांना समजावा या उद्देशाने याच शाळेतील बालप्रवचनकार चि.चैतन्य गुरव याचे प्रवचन आयोजित केले होते. त्या दिवशी एकादशीचे अध्यात्मिक, शास्त्रीय महत्त्व, परंपरा याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. त्यानंतर श्री.विठ्ठलाची आरती करून वातावरण भक्तीमय झाले.
चि.चैतन्य गुरव याने आपल्या प्रवचनात गीतेतील श्लोकाचे निरुपण केले. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत, मार्मिक विनोद करत, समर्पक आणि चपलख दृष्टांत देत आपल्या ओघवत्या बालवाणीने त्याने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. त्याला सनई आणि सिंथेसायझर ची साथ श्री किशोर गुरव यांनी केली.
साध्य:-
संतांचे कार्य व शिकवण विद्यार्थ्यांना समजली.
विद्यार्थ्यांना अभंग ओळख झाली.
प्रवचन हा कीर्तनाचा प्रकार कळला.
 
स्वसंरक्षण धडे (रक्षाबंधन)
 
उद्देश :-
  • स्वसंरक्षणाचे महत्त्व समजावे.
  • सामाजिक बांधिलकी जपणे.
शुक्रवार दि. १६ ऑगस्ट २०१९ रोजी रक्षाबंधन हा कार्यक्रम एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ट्राफिक पोलिसांना राखी बांधून सामाजिक बांधिलकी जपणे व मुलीनी स्वसंक्षण कसे करावे हा उद्देश समोर ठेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कु.राधिका सूर्यवंशी उपस्थित होत्या. प्रमुख अतिथींनी मुलींना स्वसंक्षणाचे महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे पटवून दिले. समाजात वावरत असतांना मुलींना कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते, स्वत: स्वतःचे रक्षण कसे करावे याबद्दल माहिती दिली. तसेच कोणत्याही गोष्टीला घाबरून न जाता तिला सामोरे कसे जावे, आपल्यावर आलेले किंवा आपल्या समोर दुसऱ्यावर आलेले संकट कसे दूर करावे याचेही प्रात्यक्षिक मुलींना दाखविण्यात आले. स्वसंक्षणाच्या अनेक टिप्स त्यांनी विद्यार्थीनीना दिल्या.
 
तसेच त्याचदिवशी शाळेतील मुलीनी ट्राफिक पोलिसांना राखी बांधून सामाजिक बंधिकली जपली. काही विद्यार्थीनिनी गंगापूर पोलीस चौकीतील तर काहींनी ABB सर्कलवरील पोलीस चौकीतील पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली. त्यात तेथील पोलिसांनी विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे कौतुक केले. सामाजिक बांधिलकी जपणे आजच्या काळात खूप मह्त्त्वाचे आहे त्याचे एक उदाहरण जगापुढे मांडण्याचा बालक मंदिरचा एक छोटासा प्रयत्न.
 
साध्य :-
  • सामाजिक बांधिलकी जपली व स्वसंरक्षणाचे महत्त्व समजले.
  • ABB सर्कल, गंगापूर पोलीस चौकी व भोंसला अॅडव्हेन्चर फौंडेशन येथे जाऊन राख्या बांधून सामाजिक बांधिलकी जपली
आकाशाशी जुळले नाते
 
उद्देश:-
  • अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळणे.
  • पारंपारिक खेळाचे कौशल्य आत्मसात व्हावे.
  • स्वावलंबी जीवनाचा अनुभव विद्यार्थ्याना मिळावा.
विद्यार्थ्यांमध्ये हस्तकौशल्य निर्माण व्हावे, पर्यावरण जागृती निर्माण व्हावी, यादृष्टीने कागदी पाकीट बनविणे, वर्तमानपत्रापासून पिशव्या बनविणे अशा पर्यावरणपूरक वस्तू विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केल्या. तसेच वारली चित्रकला अत्यंत कलात्मक दृष्टीने विद्यार्थ्यांनी कागदावर रेखाटली. विद्यार्थ्यांमध्ये संघभावना जोपासण्यासाठी संघाचे विविध खेळ विद्यार्थी मैदानावर खेळले. रात्रभर घराबाहेर राहण्याचा पहिला अनुभव त्यात स्वत: स्वयंपाक करून मान्यवरांचे आदरातिथ्य, स्वयंपाकाची तयारी, त्याचे पूर्वनियोजन या सर्व गोष्टी मुलांनी स्वत: नीटनेटकेपणाने पार पाडल्या. शाळेतील मित्र मैत्रिणींसह बनवलेला स्वयंपाक हा आयुष्यभराच्या आठवणीतला मोलाचा ठेवा असणार आहे. बदलत्या धावपळीच्या
आणि आधुनिक वातावरणात एका बाजूला एकत्रित कुटुंबपद्धती नाहीशी होऊ पाहत असतांना असा शाळेतील नाविन्यपूर्ण प्रयोग एका अर्थाने शाळेतील कौटुंबिक जीवनाच्या आधाराने जीवनाला दिशा देण्याचा प्रयत्न म्हणून बालक मंदिरातील बालमेळाव्याचा परिणाम हा अधिक काळ या विद्यार्थ्याच्या आयुष्यात उरणार हे नक्की. विद्यार्थ्यांनी स्वयंपाक करणे, भांडी घासणे, चूल पेटविणे इ. चा अनुभव घेतला. तसेच जेवणाचे ताट कशा पद्धतीने वाढावे असा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी जेवण्याच्या ताटाची प्रतिकृती स्वत: तयार केली व त्यामधून क्रमांक काढण्यात आले. रात्री विद्यार्थ्यांनी शेकोटी पेटवून त्याभोवती शेकोटी गीत गाऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून विद्यार्थ्यांचे योगाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
 
साध्य:-
अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला. पारंपारिक खेळाचे कौशल्य आत्मसात करून विद्यार्थ्यांनी स्वत: चुलीवर स्वयंपाक करण्याचा आनंद घेतला.
 
कथाकथन कार्यशाळा
उद्देश:-
  • विद्यार्थांच्या कलागुणांना वाव मिळणे.
  • कथाकथन हा प्रकार समजणे व तो कसा करावा याची माहिती मिळणे.
कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे सरकार्यवाह मा.श्री. दिलीपजी बेलगावकर यांनी दीपप्रज्वलनाने केले. या कार्यशाळेत त्यांनी विद्यार्थ्यांना कथाकथन कसे करावे याचे उत्तम मार्गदर्शन केले.
 
आजच्या इंटरनेटच्या जगात मुलांच्या व्यक्तिमत्त्व तसेच वक्तृत्व विकासासाठी ‘कथाकथन कार्यशाळा’ मोलाची भूमिका बजावत असतात. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत असतात. कार्यशाळेत बेलगावकर सरांनी कथाकथन करतांना देहबोली, भाषाशैली, आवाजातील चढ-उतार, हावभाव, आत्मविश्वास, गोष्टींची निवड, तन्मयता, वक्तृत्व, कथाकाराची शब्दसंपदा, चित्रमयता, बहुश्रुतपणा, श्रोत्यांचा सहभाग आणि वेळेचे भान या दशसूत्रांचे महत्त्व एका सुंदर कथेद्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच नवीन तंत्रज्ञानाचा आपण कसा चांगला वापर करावा याचे देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 
या कार्यशाळेत काही विद्यार्थ्यांनी कथा सादर केल्या. मुलांमधील उपजत गुणांना या कार्यशाळेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळाले व सादरीकरण केल्यामुळे त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण होतो. तो या कार्यशाळेत अनुभवायला मिळाला. ‘कथाकथन’ या वैविध्यपूर्ण कृतीमधून विद्यार्थ्यांमधील भाषिक कौशल्ये विकासित व्हावे. विद्यार्थ्यांची आकलनशक्ती, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता वाढावी हा या कथाकथन कार्यशाळेचा मुख्य हेतू होता.
 
साध्य:-
  • विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला.
  • कथाकथनातील दशसुत्रांची (आत्मविश्वास, अभिनय, शब्दसंपदा इ.) ओळख झाली.
संत गाडगेबाबा पुण्यतिथी (पथनाट्य)
 
उद्देश:-
  • संत गाडगेबाबांचे जीवनकार्य समजणे.
  • स्वच्छतेचा प्रचार व प्रसार करणे.
समाजातील लोकांना स्वच्छतेचे महत्व पटावे, समाजात स्वच्छतेचा प्रसार व प्रचार व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हे पथनाट्य सादर करण्यात आले आणि शाळेत मुलांची गोदावरी कल आणि आज याविषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.
 
शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छतेची महत्त्व सांगणारे तसेच अंधश्रद्धा दूर करणारे पथनाट्य गोदाघाटावर विद्यार्थ्यांनी सादर केले. सध्याची बाब लक्षात होणारे गोदाप्रदुषण स्वच्छता ही एक महत्त्वाची बाब असून त्याची जनमानसात जागृती करणे हे आपले कर्तव्य आहे, हे विद्यार्थ्यांनी त्यांच्या पथनाट्यातून सांगितले. स्वच्छतेसंदर्भात घ्यावयाची काळजी, त्यामुळे होणारे दुष्यपरिणाम, वाढणारी रोगराई विद्यार्थ्यांनी लोकांना पटवून दिली. पथनाट्य सादरीकरणानंतर विद्यार्थ्यांनी तेथील उपस्थित मुलांना व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
 
उपस्थितीत नागरिकांनी त्यांच्या मनोगतात सध्याची परिस्थिती लक्षात घेता गोदावरीचे पावित्र्य नाश पावत चालले आहे, त्याची स्वच्छता व पर्यावरण यांचा समतोल साधत हा एक स्तुत्य असा उपक्रम शाळेने राबविला म्हणून शाळेचे तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
 
स्वच्छता अभियानाअंतर्गत चालणाऱ्या ‘स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक’ या उपक्रमात सहभाग नोंदवत बालक मंदिराने केलेला हा छोटासा प्रयत्न.
 
साध्य:-
  • संत गाडगेबाबांचे जीवनकार्य समजले.
  • विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.
  • कधीही उपक्रमात सहभागी न होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग.
  • त्याच्यात आत्मविश्वास निर्माण झाला.
जयंती व पुण्यतिथी साजरीकरण
 
उद्देश :-
  • पुढे न येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये धीटपणा वाढवणे
  • अप्रगत मुलांच्या मनातील भिती दूर करणे.
दरवर्षी वक्तृत्व चांगले असणारे नेहमी स्टेजवर बोलणारे विद्यार्थी स्वगत माहिती स्वरुपात किंवा नाट्यीकरण याद्वारे जयंती व पुण्यतिथी साजरी करत होते. यावर्षी जे विद्यार्थी कधी पुढे येत नाही, अभ्यासही साधारण असतो, बोलायला घाबरतात अशा विद्यार्थ्यांना पुढे आणावे असा विचार करण्यात आला.
 
प्रत्येक वर्गाला वर्षभरातील होणारी जयंती व पुण्यतिथी ह्यांची असेल त्यांची माहिती असणारे पुस्तक देण्यात आले. उदा. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सावता माळी, लाल बहादूर शास्त्री सर्व प्रथम हे विद्यार्थी निवडले. त्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाचावयास देण्यात आली. पुण्यतिथी किंवा जयंतीच्या दिवशी यातील दोन विद्यार्थ्यानी पुढे येऊन माहिती सांगितली. याप्रमाणे वर्षभराचे नियोजन करण्यात आले. नंतर पूर्ण वर्गातील विद्यार्थी या पुस्तकाचे एका वर्गातील दोन विद्यार्थी वेशभूषेसह सादर करण्यात आले. काही माहिती मुलांनी उत्स्फूर्त जमा केली.
साध्य :-
  1. मुलांचा आत्मविश्वास वाढला.
  2. हे सर्व सक्तीचे केल्याने मुलांचे वाचन कौशल्य वाढले.
********************
 
काही विशेष उपक्रम पुढीलप्रमाणे
वैदिक वाढदिवस यज्ञ :-
शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस वैदिक पद्धतीने आणि वाढदिवसाचा श्लोक म्हणून साजरा करण्यात आला.
 
शालेय निवडणूक :-
शालेय निवडणुकीत राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी प्रमाणे शपथविधी घेण्याचा प्रयत्न केला. त्यात मुलांनी निवडणुकीचा प्रचार केला, आचारसंहिता, लोकशाही पद्धतीने मतदान केले. व त्यानंतर शपथविधीचा सोहळा पार पाडण्यात आला.
 
चला तंत्रज्ञानाकडे :-
कॉम्पुटर हि आजच्या जगात काळाची एक गरज आहे. त्यात विद्यार्थ्यांनी ही गरज एक कला म्हणून जोपासणे आवश्यक आहे. या गोष्टीला अनुसरून विद्यार्थ्यांनी एक विषय घेऊन त्याचे सादरीकरण ppt द्वारे केले. त्यात त्यांनी वेगवेगळ्या चित्रांचा, व्हिडिओ, चलचित्रांचा, आवाजांचा समावेश करून आकर्षक बनविण्याचा प्रयत्न केला होता.
 
वनसप्ताह:-
वनसप्ताहनिमित्त मुलांसाठी वृक्षभिशी हा आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला.
 
पालकांना उदबोधनपर व्याख्यान (डॉ.सौ.नेहा शिरोरे)
पालकांशी जवळीक साधणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन विस्तार आधिकारी मा. सौ. नेहा शिरोरे यांनी पालकांना उदबोधनपर व्याख्यान दिले. या व्याख्यानाअंतर्गत मुलांना कसे घडवावे, यावर मार्गदर्शन केले. मुलाचं हे वय प्रतिमा निर्मितीच आहे, त्यांना घडविताना आज यशाबरोबरच अपयश देखील पचविण्याची क्षमता त्यांच्या मध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांची शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक गरज ओळखून त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. जगणं हे आनंददायी असते हे त्यांना तेंव्हाच कळेल, जेंव्हा त्यांना जीवनातील सौंदर्य कळेल, जीवनातील सौंदर्य मुलांपर्यंत पोहचवा, तसेच आपल्या मुलांवर विश्वास ठेवा कारण अनेक टप्प्यातून मुलं घडत असतात.
 
NDA:-
एन.डी.ए. च्या दृष्टीने कारगिलनिमित्त देशाचे संरक्षण, सैनिकांच्या कुटुंबांचे कथन / मनोगत, मी ऐकलेला एक सर्जिकल स्ट्राइक या सारख्या विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात आली.
एन.डी.ए. च्या संदर्भात पालकांना व विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी रिटायर्ड विंग कमांडर श्री.अनिल सिन्हा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
 
माता पालक मेळावा :-
पाल्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सकस आहाराची माहिती व संस्कार सहज पद्धतीने कसे करावे याची माहिती माता पालकांना मिळणे, सण साजरे करण्यामागील पारंपारिक व वैज्ञानिक कारणे माता पालकांना अवगत होणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
 
हिंदी दिवस :-
विद्यार्थ्यांच्या मनात हिंदी विषयांची गोडी निर्माण होण्यासाठी हिंदी भाषेतून गाणे, गोष्टी, खेळ, रोजच्या वापरातील वस्तू, भाज्या यांची नावे माहित होण्याच्या दृष्टीने हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
 
विक्री उपक्रम :-
विक्री उपक्रमांतर्गत मुलांचे विक्री कौशल्य वाढावे, हिशोब करता यावा, संवाद कौशल्य वाढावे यासाठी मुलांनी पणत्या, वाती, रांगोळी, स्टीकर व मुलांनी स्वतः तयार केलेल्या मेणबत्त्याची विक्री केली.
 
कथाकथन स्पर्धा :-
संस्थेचे संस्थापक डॉ. मुंजे यांच्या जयंतीनिमित्त मुलांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बालवाडी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी शौर्यकथा या विषयावर कथाकथन सादर केले.
गणित दिन :-
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री. गोटखिंडीकर सर उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात डॉ.रामानुजन यांचे गणितासंबंधीत बरेच प्रसंग गोष्टी रुपात सांगितले तसेच गणितातल्या अनेक गमती-जमती देखील सांगितल्या यात परस्पर मित्र संख्या, π ची किंमत, मोठ्या संख्यांचे पाढे झटपट तयार करण्याचे कौशल्य वैदिक पद्धतीने साध्या व सोप्या भाषेत विद्यार्थ्याना समजावून सांगितले. वैदिक गणिताचे महत्व विषद करताना त्यांनी एकक स्थानी ९ असलेल्या संख्यांचे पाढे कसे तयार करावे हे उदाहरणासहित स्पष्ट केले आणि विद्यार्थ्यानांही पाढे तयार करण्यास सांगितले. तसेच वैदिक गणिततज्ञ जगद्गुरु शंकराचार्य स्वामी भारतीकृष्ण तीर्थ व्यंकटरमन शास्त्री यांच्या विषयी देखील विद्यार्थ्यांना माहिती दिली.
 
ग्राहक दिन :-
मा.श्रीमती. वाघमारे यांनी विद्यार्थ्याना ग्राहकांच्या हक्काविषयी तसेच त्यांच्या कर्तव्याविषयी मार्गदर्शन केले. यात चुकीच्या गोष्टींना विरोध करणे, चिकित्सकपणे खरेदी करणे, ग्राहक चळवळ निर्भीडपणे चालवणे हे सागितले. ग्राहक दिनानिमित्त ५० शाळांमध्ये विद्यार्थी ग्राहक मंडळ आजपासून सुरु होत आहे याचीही माहिती त्यानी दिली. ग्राहक मंचाविषयी आणि मंचाच्या असलेल्या कायद्यातील तरतुदींविषयी विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. ग्राहक हक्कांबरोबरच पर्यावरणाचे सरंक्षण या कर्तव्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली.
 
कंकणाकृती सूर्यग्रहण :-
सूर्यग्रहण म्हणजे काय? ते कसे होते? हे विद्यार्थ्यांना समजणे या उद्देशाने हे प्रत्यक्ष अनुभवाने मुलांना दाखविण्यात आले. हे सूर्यग्रहण होत असतांना मुलांना सूर्य, चंद्र, पृथ्वी यांची स्थिती कशी असते, आणि ती हळूहळू कशी बदलत जाते, याचे मार्गदर्शन दिले जात होते. याचा पूर्वाभ्यास व्हावा, विद्यार्थ्यांना याची माहिती व्हावी, यासाठी खगोल मंडळातर्फे श्री. बाबर तसेच श्री. अनिल चव्हाण यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या व्याख्यानांतर्गत त्यांनी मुलांना ग्रहणाविषयी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी मुलांना सूर्याच्या बदलणाऱ्या स्थिती ppt द्वारे दाखविल्या.
 
इतर विशेष बाबी :-
विद्यार्थ्यांनी स्वतः खत तयार करून त्याची विक्री केली.
भारतीय संविधानाची माहिती व वैशिष्ठ्ये याविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली.
यावर्षी नाशिकमधील नावाजलेल्या संस्थेमध्ये घेतलेल्या वक्तृत्व, कथाकथन स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती.
गणित विषयात विद्यार्थ्यांनी कृतीसंशोधन केले आहे.
विद्यार्थ्यांनी स्वत: बागकाम केले.