सांस्कृतिक उपक्रम

शिशुविहार व बालक मंदिर 5-7    24-Dec-2019
Total Views |
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे भारतीय संस्कृतीचे संवर्धन करणे, विद्यार्थ्यांना आपण साजरे करत असलेल्या सणांचे महत्त्व समजण्याच्या हेतूने शाळेत सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. तसेच, आपल्या देशासाठी बलिदान केलेल्या नेते व क्रांतिकारक यांच्या जयंती व पुण्यतिथीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व राष्ट्रप्रेम निर्माण करणे या हेतूने आपण शाळेत सांस्कृतिक उपक्रम राबवत असतो.
 
शाळेचा पहिला दिवस
 
मंगलमय वातावरणात व उत्साहात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात व्हावी म्हणून दरवर्षी राम मंदिरात दर्शनास नेऊन, नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात येते.
 
वाढदिवस यज्ञ
 
पारंपारिक पद्धतीने जन्मदिन साजरा करण्याचे महत्व विद्यार्थांना कळावे यासाठी वेदिक पद्धतीने वाढदिवस यज्ञ केला जातो.
 
आषाढी एकादशी
 
वारकरी संप्रदायाची ओळख व्हावी तसेच संतांची शिकवण कळावी यासाठी दिंडी काढून , विविध अभंग सादर करून ,संतांच्या वेशभूषा करून आषाढी एकादशी साजरी केली जाते.
 
गुरुपौर्णिमा
 
गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त व्हावी या हेतूने गुरुपोर्णिमा साजरी केली जाते.
 
दिप अमावस्या
 
मंगल्याचे प्रतिक असलेल्या दिव्याचे व प्रकाशाचे महत्व समाजावे व भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी दीप अमावस्या साजरी केली जाते.
 
नागपंचमी
 
विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम निर्माण व्हावे व साप या प्राण्याबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने नागपंचमी साजरी केली जाते
 
श्रावण बहार
 
भारतीय संस्कृतीतील व्रत्वैकाल्यांची माहिती व्हावी या उद्देशाने श्रावण बहार हा कार्यक्रम साजरा केला जातो तसेच श्रावण महिन्यातील निसर्गाचे सौंदर्याचा आस्वाद विद्यार्थ्यांना देण्यात येतो.
 
दहीहंडी
 
विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना जोपासली जावी यासाठी जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचे आयोजन करण्यात येते.
 
घटस्थापना
 
विद्यार्थ्यांना आदिशक्ती देवीची माहिती व्हावी यासाठी घटस्थापना व नाव्रत्रीबद्दल माहिती सांगितली जाते.
 
गीता जयंती
 
भारतीय संस्कृतीतील धर्मग्रंथांची ओळख होण्यासाठी गीताजयंती साजरी करतात.
 
सामाजिक उपक्रम
 
सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने शाळेत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. स्वच्छतेचा प्रसार व्हावा यासाठी विद्यार्थी आपल्या घराजवळील आजूबाजूच्या परिसरात माहिती सांगून महत्व पटवून देतात. स्वच्छतेचा प्रसार संदेश समाजापर्यंत पोहोचावा यासाठी पथनाट्याद्वारे समाजात जागृती करतात. तसेच पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी रासायनिक खते न वापरता सेंद्रिय खते वापरून समाजाला पर्यावरणाचे महत्त्व पटवून देतात.
राखी पौर्णिमा
 
सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने समाजात विविध सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींना उदा. पोस्टमन, पोलीस, सिक्युरिटी गार्ड,यांना आमंत्रित करण्यात येते.
 
संत गाडगेबाबा पुण्यतिथी
 
संत गाडगेबाबा यांच्या जीवनाची माहिती व्हावी व स्वच्छतेचा प्रसार संदेश समाजापर्यंत पोहोचावा यासाठी विद्यार्थी संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करतात .पथनाट्याद्वारे जागृती करतात.
 
खत प्रकल्प
 
रासायनिक खते न वापरता सेंद्रिय खते वापरून पर्यावरणाचे संवर्धन व्हावे तसेच सेंद्रिय खतांचे महत्व विद्यार्थ्याना कळावे यासाठी विद्यार्थी स्वतः खात तयार करतात व त्याची विक्री करतात.
 
स्वच्छता दूत
 
स्वच्छतेचा प्रसार व्हावा यासाठी विद्यार्थी आपल्या घराजवळील आजूबाजूच्या परिसरात माहिती सांगून महत्व पटवून देतात.
गणेशोत्सव स्पर्धा
 
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी गणेशोत्सवात विविध स्पर्धा घेण्यात येतात. विद्यार्थी आपल्या आवडीप्रमाणे त्यात सहभागी होतात.
निवासी बालमेळा
 
स्वयंपाकाचा आनंद , शैक्षणिक खेळ , मैदानावरील खेळ , प्रश्न मंजुषा , पारंपारिक साहित्य व खेळांची ओळख २ दिवसीय निवासी बाल मेळ्यात करून देण्यात येते तसेच या द्वारे व्यक्तिमत्व विकास साधला जातो.
अभिव्यक्ती
 
शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांना आपले छंद जोपासता यावेत यासाठी दर शनिवारी अभिव्यक्ती अंतर्गत विद्यार्थी बागकाम, पाककला , चित्रकला , हस्तकला , गायन , लेझीम, झांज , शिवणकाम इ. गोष्टी करतात.
हस्तकला प्रदर्शन
 
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात येते. यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते
राजू- मीना मंच
 
विद्यार्थ्यांच्या काही समस्या, बालमनात पडणारे प्रश्न यांचे निराकरण व समुपदेशन, मार्गदर्शन ह्या मंचात केले जाते . विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन शिक्षिका मार्गदर्शन करतात.