विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित पृथा फेस्टिवलमध्ये स्वर सप्तक (सरगम गीत) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये शिशुविहार व बालक मंदिर मराठी माध्यमाच्या (१ली ते ७वी) विद्यार्थ्यांनी 'द्वितीय' क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. या स्पर्धेत अंजली जाधव, आराध्य राजगुरू, कादंबरी महाजन, वैष्णव वाघ, वैदिक खराटे, श्रावणी पुरकर, श्रेया जाधव, स्वामिनी नवले या विद्यार्थ्यांनी यमन रागातील सरगमगीत सादर केले. त्यांना हार्मोनियमवर साथ सिद्धी कुलकर्णी व तबल्यावर साथ ओंकार इनामदार यांनी केली. या स्पर्धेसाठी संगीत शिक्षिका सौ. मनीषा इनामदार, सौ. सावनी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता पाटील मॅडम, शालेय समिती अध्यक्षा सौ. सुवर्णा दाबक मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.