जसे एखादे रोप खतपाणी घातल्यानंतर योग्य निगा राखल्यानंतर जसे जोमाने वाढू लागते त्याचप्रमाणे बालक मंदिर या रोपट्याचे सुद्धा उत्तम संस्कार व ज्ञान संवर्धनाने एका बहरलेल्या वृक्षात रुपांतर झाले.
वाढदिवस यज्ञ
पारंपारिक पद्धतीने जन्मदिन साजरा करण्याचे महत्व विद्यार्थांना कळावे यासाठी वेदिक पद्धतीने वाढदिवस यज्ञकेरन यात आला यामध्ये विद्यार्थांचे कॉलेजमध्ये शिकणारे ताई-दादा तसेच भोंसला मिलिटरी स्कूल मधील काही विद्यार्थी यांचा वाढदिवस साजरा केला गेला.
स्वच्छता दूत
स्वच्छतेचा प्रसार व्हावा यासाठी विद्यार्थी आपल्या घराजवळील आजूबाजूच्या परिसरात माहिती सांगून महत्व पटवून देतात.
राखी पौर्णिमा

श्रावण बहार
श्रावणोत्सव साजर करण्यात आला वा वर्षागीतगायनाचा कार्यक्रम
क्रीडा साप्ताह
विद्यार्थ्यांच्या तसेच पालक व शिक्षकांच्या विविध क्रीडा स्पर्धा

विभागप्रमुखांचे मनोगत

विभागप्रमुखांचे मनोगत

शैक्षणिक दृष्टीकोन व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या से.हि.मि.ए.सो. संचालित, बालक मंदिर इ. ५वी. ते ७वी विभागवार वर्गरचना करण्यात आली . अपेक्षित असलेला सर्वांगीण विकास व्हावा हा उद्देशसमोर ठेवून शिक्षकांमध्ये जिद्दीने चिकाटीने काम करण्याची ताकद निर्माण करून त्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची उज्ज्वल पिढी घडवण्याचा प्रयत्न केला जातो.

शाळेमध्ये केवल पुस्तकी ज्ञान न देता संगीत, चित्रकला , नृत्य, हस्तकला , योगासन, रामदंडी व व्यक्तिमत्त्व विकास यासाठी सहशालेय कार्यक्रम घेऊन जीवनशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो . विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार विकास घडवताना चारित्र्यसंपन्न ,सद्वर्तनी, आत्मनिर्भर, कार्यकुशल, सामाजिक बांधिलकी जपणारा विद्यार्थी उभा राहणे आवश्यक आहे. हे भारतीय मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा हेतू व श्रद्धा आहे.

ज्ञान , उपक्रम ,वर्तन , शिस्त , नियम या सर्वांचा मिलाफ साधून शाळेतील विद्यार्थी उत्तम जीवन जगण्यास तयार करण्याचा वसा घेऊन सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करतात . आमचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वात मोलाचे मार्गदर्शन मिळते ते संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे. आमच्या प्रयत्नांना आपल्या शुभेच्छांची किनार लाभावी ही इच्छा! धन्यवाद!

शाळेविषयी थोडेसे :

“इवलेसे रोप लावियेले द्वारी”
“तयाचा वेलू गेला गगनावरी”

खरोखरच उक्तीप्रमाणे जसे एखादे रोप खतपाणी घातल्यानंतर योग्य निगा राखल्यानंतर जसे जोमाने वाढू लागते त्याचप्रमाणे बालक मंदिर या रोपट्याचे सुद्धा उत्तम संस्कार व ज्ञान संवर्धनाने एका बहरलेल्या वृक्षात रुपांतर झाले.

आज इ. ५वी ते ७वी च्या एकूण १२ तुकड्या आहेत.

व्यक्तिमत्त्व व बौद्धिक विकासासाठी शाळेमध्ये अभ्यासाबरोबरच इतर अनेक शालेय उपक्रम, बहिःशालेय उपक्रम घेतले जातात आणि त्यामुळे केवळ एक साचेबंध शिक्षण न देता नवनिर्मिती, व्यक्तिमत्व विकास , आंतरिक कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न सतत केला जातो . यामध्ये शालेय कृतिसंशोधन, गणित सूत्र दृढीकरण, पाढे प्रकल्प, वाचन प्रकल्प , इंग्रजी व मराठी वक्तृत्व आणि संभाषण, क्षेत्रभेट, विज्ञान प्रदर्शन इ. उपक्रम घेतले जातात.

“आरोग्यं धनसंपदा” याची जाण असल्याने शारिरीक सुदृढतेसाठी विविध प्रकारचे उपक्रम होतात. यामध्ये योगासने, कवायती, क्रीडामहोत्सव यांसारखे उपक्रम घेऊन भोंसलाच्या मैदानावर विद्यार्थ्यांना धावण्याचा सरावही दिला जातो. तसेच मध्यल्या सुट्टीत कॅरम.बॅडमिंटन अशा खेळांचे साहित्य पुरविले जाते. तज्ञ डॉकटरांकडून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होते. भारतीय संस्कृतीची ओळख , त्याबद्दलचा सार्थ अभिमान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा यासाठी वाढदिवस यज्ञ, विविध सणाचे सादरीकरण यासरख्या उपक्रमातून प्रयत्न केला जातो. तसेच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वर्षभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उदा. शालेय स्नेहसंमेलन, समूहगान स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पुष्परचना ,रांगोळी, पाककला स्पर्धा अभिव्यक्ती अंतर्गत घेतल्या जातात.

भौगोलिक परीसारचे ज्ञान व्हावे तसेच विद्यार्थ्यांनी आत्मव्हावे निर्भर यासाठी क्षेत्राभेटीचे आयोजन केले जाते. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विद्यार्थी कुठेही मागे पडू नये यासाठी विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. विक्री कौशल्य, आनंदमेळा , निवासी बालमेळा यासारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे वैज्ञानिक , व्यावहारिक, विक्री, संघभावना व स्वावलंबन यांसारखे गुण विकसित केले जातात. पालकांमधील सजकता वाढावी तसेच पाल्यांच्या अडचणी समजून घेऊन पा. शि. संघाची स्थापना केली जाते. उत्तम वक्ते बोलावून पालकांचे उद्बोधन केले जाते. अशाप्रकारे विद्यार्थी केंद्रित असलेल्या आमच्या या विभागात प्रशिक्षित अध्यापक असून अध्यापनामध्ये आधुनिक तंत्रसाधानांचा वापर केला जातो.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लिस्ट

नावपद
सौ. नीता सुधीर पाटील विभाग प्रमुख
सौ. अनुराधा प्रफुल्ल पिंपरकर उपशिक्षिका
सौ. मिनल राजेंद्र महाजन उपशिक्षिका
श्रीम. अनुराधा माधव नामजोशी उपशिक्षिका
श्रीम. वैशाली छबुराव डुंबरे उपशिक्षिका
सौ. अर्चना रमेश दिवाण उपशिक्षिका
सौ. वैशाली मिलिंद गोसावी उपशिक्षिका
सौ. सावनी परिमल कुलकर्णी संगीत शिक्षिका
सौ. कविता भुषण क्षत्रिय क्रिडा शिक्षिका
१० सौ. चैताली जयप्रकाश कामळे उपशिक्षिका
११ सौ. सुनयना विकास आंबेकर चित्रकला शिक्षिका
१२ सौ. वंदना संतोष राणे उपशिक्षिका
१३ सौ. वृषाली अजय लिटे उपशिक्षिका
१४ सौ. नीता चंद्रशेखर घरटे उपशिक्षिका
१५ श्री. योगेश अशोक चकोर उपशिक्षिका
१६ सौ. प्रिती हेमंत यावलकर उपशिक्षिका
१७ श्रीम. सुषमा मधुकर कुलकर्णी उपशिक्षिका
१८ सौ. पुनम निवृत्ती पाटील संगणक शिक्षिका
१९ कु. यशश्री सुहास करंजीकर संगणक शिक्षिका

नावपद
२० सौ. रक्षा नितिन जाधव लिपिक
२१ श्री. अजिंक्य राजू सोनवणे असि.लिपिक
२२ सौ. सुमन भिला पगारे शिपाई
२३ श्री. संदीप रामदास सकपाळ शिपाई
२४ श्री. योगेश सखाराम बागुल शिपाई
२५ श्री. संदिप शांताराम वाघ शिपाई
२६ श्री. प्रसाद शरद बस्ते Computer Lab Assitant

पोहोचण्याचा मार्ग

Contact Us

शिशुविहार व बालक मंदिर
राम भूमी नाशिक
पिनकोड - ४२२००५

दूरभाष : - 0253-2309603
E-mail: social.pr@bmm.bhonsala.in